Monika Lonkar –Kumbhar
उन्हाळ्यात चेहऱ्यावर मेकअप व्यवस्थित लावणे, हे अतिशय अवघड काम आहे.
मेकअप नीट केला नाही तर तो घामामुळे पूर्ण बिघडून जातो.
उन्हाळ्यात मेकअप करताना आरोग्यासोबतच त्वचेची खास काळजी घ्यावी लागते.
उन्हाळ्यात चेहऱ्याचा मेकअप कसा करायचा? त्याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
चेहऱ्यावर मेकअप करण्यापूर्वी सर्वात आधी चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या. यामुळे, तुमच्या चेहऱ्याला जास्त वेळ घाम येणार नाही.
मेकअप करण्यापूर्वी चेहऱ्यावर बर्फ लावा. यामुळे, तुमची त्वचा घट्ट होण्यास मदत होईल.
उन्हाळ्यात चेहऱ्यावर फाऊंडेशन लावू नका.यामुळे, चेहऱ्यावर घाम जास्त प्रमाणात येऊ शकतो. त्याऐवजी बीबी क्रीमचा वापर करा.
उन्हाळ्यात डार्क रंगाची लिपस्टिक लावल्यामुळे ती घामामुळे पसरण्याचा धोका असतो. त्याऐवजी तुम्ही न्यूड रंगाची लिपस्टिक लावा.