Anuradha Vipat
अरबाज खानने नुकतेच मेकअप आर्टिस्ट शूरा खानशी लग्न केले. अरबाजच्या दुसऱ्या लग्नामुळे मलायका अरोराही चर्चेत आहे.
प्रत्येकजण या लग्नावर अभिनेत्रीची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत ती आजकाल सोशल मीडियावर जे काही शेअर करत आहे तो चर्चेचा विषय बनला आहे.
दरम्यान, अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचा मुलगा अरहानसोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे, जो ख्रिसमसच्या दिवशीचा असल्यासारखा दिसत आहे.
फोटोमध्ये अरहानने मोठी सांता कॅप घातलेली दिसत आहे. आई आणि मुलाचे सुंदर बंध फोटोत पाहायला मिळतात. ही पोस्ट शेअर करताना मलायकाने तिच्या मुलाला तिचा सपोर्ट सिस्टीम असे म्हटले आहे.
ती लिहिते की आता 'हे वर्ष संपणार आहे... माझे कायमचे... माझे बाळ, माझा सर्वात चांगला मित्र आणि माझी सपोर्ट सिस्टम, माझा मुलगा...' तिच्या पोस्टवर टिप्पण्यांचा पूर आला आहे.
अलीकडेच, डान्स रिअॅलिटी शोमध्ये फराहने मलायकाला विचारले की ती 2024 मध्ये सिंगल पॅरेंट आणि अभिनेत्रीपासून दुहेरी पालक अभिनेत्री बनणार आहे का? याला उत्तर देताना मलायका म्हणते की कोणी विचारले तर का नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.