Anuradha Vipat
अभिनेता अर्जुन कपूर त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाहीतर, खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतो.
आज अर्जुन कपूर याचा वाढदिवस आहे. वाढदिवस असल्यामुळे मंगळवारी अर्जुनच्या घरी पार्टी ठेवण्यात आली होती.
यावेळी अर्जुनने कुटुंबिय आणि मित्रांसोबत वाढदिवस साजरा केला.
अर्जुनला शुभेच्छा देण्यासाठी अनेक सेलिब्रिटी अभिनेत्याच्या घरी पोहोचले होते.
पण अभिनेत्री मलायका अरोरा मात्र पार्टीतून गायब होती.
यामुळे आता पुन्हा मलायका आणि अर्जुन यांच्या ब्रेकअपच्या चर्चांनी जोर धरला आहे.
2019 मध्ये मलायका – अर्जुन यांनी सर्वांसमोर त्यांच्या नात्याची घोषणा केली होती .