Anuradha Vipat
मनीषा रानीने तिला आलेल्या कास्टिंग काऊचच्या धक्कादायक अनुभवावर भाष्य केलं आहे.
'बिग बॉस' या लोकप्रिय वादग्रस्त कार्यक्रमात सहभागी होता यावं यासाठी ती प्रयत्न करत होती.
त्यावेळी एक व्यक्ती तिच्या संपर्कात आला. तो 'बिग बॉस'च्या टीमचा भाग आहे, असं त्याने तिला सांगितलं होतं.
त्यानंतर तिने त्याच्यासोबत काही डान्स व्हिडीओदेखील शेअर केले. मनीषा म्हणाली की, त्या व्यक्तीने तिला 'बिग बॉस'मध्ये पाठवण्याचं आश्वासन दिलं होतं.
मनीषा पुढे म्हणाली की तो व्यक्ती मला वेगवेगळ्या जागेवर भेटायला बोलावायचा. त्यामुळे मला थोडा संशय आला.
मनीषा पुढे बोलताना म्हणाली एकदा तर त्याने मला मध्यरात्री 3 वाजता फोन करुन त्याच्या घरी भेटायला बोलावलं होतं.