Anuradha Vipat
अभिनेत्री मानसी नाईक आपल्या सोशल मीडिया पोस्टमुळे खूप चर्चेत असते
आता मानसीने मराठी लूकमधील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत
मानसीच्या या फोटोंच्या कॅप्शनने लक्ष वेधून घेतले आहे.
मानसीने लिहिलं आहे की, आपल्याला काहीतरी मिळत आहे असे म्हणून कोणत्याही गोष्टीवर सेटल होणाऱ्या लोकांच्या या जगात सिंगल राहण्यासाठी खूप धाडस असावे लागते.
पुढे मानसीने लिहिलं आहे की, चुकीच्या व्यक्तीसोबत राहण्यापेक्षा सिंगल राहणं कधीही चांगलं आहे.
मी कधीही मागे वळून पाहत नाही, मी कधीही हार मानणार नाही कधीही नाही असंही पुढे तिने लिहिलं आहे
चीयर्स टू बीइंग मी असं कॅप्शन मानसीने या फोटोंना दिलं आहे.