Mansoon: पावसाळ्यात 'या' गोष्टी खाणे कटाक्षाने टाळा

सकाळ डिजिटल टीम

पावसाळ्यात सर्वत्र दमट हवा असते. यामुळे आपली पचनशक्ती मंदावते. त्यामुळे आपण जड पदार्थ खाणे टाळावे. हे पदार्थ पावसाळ्यात पचत नाहीत आणि त्यामुळे अतिसार, पोटदुखी असे आजार उद्भवू शकतात

पावसाळ्यात मांसाहार घेणे पुर्णपणे बंद करावे. तिखट, स्पाईसी पदार्थही खाऊ नयेत.

उन्हाळ्यात आपण कोशिंबीरच्या माध्यमातून भरपूर सलाड खातो. परंतू पावसाळ्यात मात्र कोणत्याही भाज्या कच्च्या खाणे पुर्णपणे टाळावे. कारण पचनशक्ती मंद झाल्याने त्यांचे पचन होत नाही.

पावसाळा सुरू झाल्यावर आंबा देखील पचत नाही. त्यामुळे पाऊस पडताच आंबा खाण्याचा मोह टाळावा

या दिवसांमध्ये पालेभाज्या खाणे पुर्णपणे बंद करावे. याचे मुख्य कारण म्हणजे या भाज्या जेव्हा शेतात असतात तेव्हा त्यांची लांबी लहान असल्याने मातीतील तसेच पावसाच्या पाण्यातील जीवजंतू भाज्यांमध्ये जातात आणि त्या माध्यमातून आपल्या घरात येतात.

बेसन पीठापासून, मैद्यापासून बनविलेले पदार्थ पावसाळ्यात पुर्णपणे टाळावे.

अनेकांना स्ट्रीट फूड खाण्याची आवड असते. मात्र तुम्ही पावसात भिजल्यावर अशा प्रकारचे स्ट्रीट फूड खाणार असाल तर त्यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते.

पाणीपुरी तर सर्वांचाच आवडता पदार्थ असतो. मात्र रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या पाण्यात पाणीपुरीत दूषित पाणी वापरले जाऊ शकते. यासाठी पावसाळ्यात रस्त्यावर विकली जाणारी पाणीपुरी मुळीच खाऊ नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.