मनू भाकरचा 'असा' आहे करियर ग्राफ

Amit Ujagare (अमित उजागरे)

नेमबाज मनू भाकर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी तिसरं पदक जिंकण्याच्या तयारीत आहे.

Manu Bhaker

२५ मीटर एअर पिस्तूल प्रकारात तीनं फायनल गाठली असून शनिवारी ही मॅच होणारेय.

ही मॅच जिंकल्यास ती भारतासाठी आणखी एक पदक मिळवणारेय. असा विक्रम करणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू ठरेल.

Manu Bhaker

पण इतक्या आत्मविश्वासानं खेळणाऱ्या मनू भाकरचं खेळाचं करियर कसं राहिलंय जाणून घेऊयात.

Manu Bhaker

१४ व्या वर्षी मनू भाकरनं शुटिंग अर्थात नेमबाजीला आपलं करियर बनवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी नुकतंच रियो ऑलिम्पक (२०१६) संपलं होतं.

Manu Bhaker

२०१७च्या राष्ट्रीय शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये मनू भाकरने ऑलिम्पियन हीना सिद्धूसोबत २४२.३ पॉईंटनं नवं रेकॉर्ड बनवलं. त्यानतंर हीनाला फायनलमध्ये हारवलं.

Manu Bhaker

याशिवाय २०१७ मध्ये तिनं एशियन ज्युनिअर चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकलं. यानंतर मेक्सिकोच्या ग्वाडलजारा इथं आंतरराष्ट्रीय शूटिंग महासंघाच्या वर्ल्डकपमध्ये तिनं पहिल्यांदाच सहभागी होत १० मीटर एअर पिस्तूलच्या फायनलमध्ये धडक दिली. इथं पात्रता फेरीत तिनं ज्युनिअर वर्ल्ड रेकॉर्ड तोडलं.

Manu Bhaker

केवळ १६ व्या वर्षी ISSF वर्ल्ड कपमध्ये सुवर्ण पदक जिंकणारी ती सर्वात कमी वयाची भारतीय खेळाडू ठरली.

Manu Bhaker

त्यानंतर एका महिन्यानं २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टमध्ये कॉमनवेल्थ गेम्समध्ये महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल इव्हेंटमध्ये सुवर्णपदक जिंकलं.

Manu Bhaker

त्यानंतर म्युनिच वर्ल्डकप २०१९, टोकियो २०२०, ISSF २०२१ आणि काहिरा वर्ल्ड कप चॅम्पियनशिप २०२२, हांगझोऊ एशियन गेम्समध्येही तीनं सुवर्ण पदक पटकावलं.

Manu Bhaker

'रणजी'त फक्त एकच मॅच खेळला अन् बनला 'BCCI'चा बॉस

Anurag Thakur
येथे क्लिक करा...