Swadesh Ghanekar
मनु भाकरने १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात जिंकले वैयक्तिक कांस्यपदक...
नेमबाजीत भारताला पदक जिंकून देणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली आहे.
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या पदकाचे खाते मनु भाकरच्या कांस्यने उघडले
२०१८च्या राष्ट्रकुल स्पर्धेत मनु भाकरने सुवर्णपदक जिंकले होते. त्याचवर्षी तिने वर्ल्ड कप स्पर्धेतही गोल्ड जिंकले आणि १६व्या वर्षी पदक जिंकणारी ती युवा नेमबाज ठरली.
मनु भाकरने आतापर्यंत विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये १७ सुवर्ण, ४ रौप्य व २ कांस्य पदकांची कमाई केली आहे.
मनु भाकरच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर X ( आधीचं ट्विटर) कडून सन्मान करण्यात आला. तिच्या नावासमोर आयफिल टॉवरची इमेज लावली गेली.
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या प्रत्येक खेळाडूच्या अकाऊंटच्या नावासमोर आयफिल टॉवरची इमेज आपोआप लावली जात आहे.