Pranali Kodre
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत भारताची नेमबाज मनू भाकरने कांस्य पदक जिंकत इतिहास रचला.
२२ वर्षीय मनू भाकरने महिला १० मीटर एअर पिस्तुल क्रीडा प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचं पदकांचे खातंही उघडलं.
मनू भाकर नेमबाजीमध्ये पदक जिंकणारी भारताची पाचवी नेमबाज, तर पहिलीच महिला नेमबाज ठरली आहे.
भारताकडून नेमबाजीत सर्वात पहिल्यांदा राज्यवर्धन सिंग राठोडने २००४ साली एथेन्स ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकलं होतं.
त्यानंतर २००८ साली अभिनव बिंद्राने बिजिंग ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकत इतिहास रचला.
साल २०१२ मध्ये लंडनला झालेल्या ऑलिम्पिकमध्ये नेमबाज विजय कुमारने रौप्य पदक जिंकले.
साल २०१२ मध्येच लंडन ऑलिम्पिकमध्ये गगन नारंगने कांस्य पदक जिंकले होते.