Anuradha Vipat
‘वाट बघतोय रिक्षावाला’ या गाण्यामुळे मानसी नाईकने घराघरांत लोकप्रियता मिळवली
मानसी अनेक सामाजिक मुद्द्यांवर अभिनेत्री आपलं स्पष्ट मत मांडत असते.
नुकतीच मानसीने एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी मानसीने अनेक विषयांवर आपलं मत मांडलं.
अलीकडच्या अनेक मुली मूलबाळ नको असं सांगतात यावर एक नव्या पिढीतील अभिनेत्री म्हणून तुझं काय मत आहे?” असा प्रश्न मानसी नाईकला विचारला गेला.
यावर मानसी म्हणाली, “अनेकदा मला वाटतं मी फार वेगळ्या काळात जन्म घेतलाय कारण, याबाबतीत माझे विचार खूप वेगळे आहेत.
खरंतर मूल होण्याचा प्रवास फक्त आपण आई-बाबा होणं यापुरता मर्यादित नसतो. याउलट आपले आई-बाबा आजी-आजोबा होणार हा गोडवा खूप मोठा असतो. फक्त त्यांचा आनंद पाहण्यासाठी तरी मला नक्कीच आई व्हायचंय असंही मानसी म्हणाली