अशी आहे जरांगे पाटलांची व्हॅनिटी व्हॅन...

संतोष कानडे

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटलांच्या सुरक्षेसाठी आता व्हॅनिटी व्हॅन तैनात करण्यात आलेली आहे

२० जानेवारी

शनिवार, दि. २० जानेवारीपासून जालन्यातल्या अंतरवाली सराटी येथून मराठा आंदोलक मुंबईकडे कूच करणार आहेत

व्हॅनिटी व्हॅन

मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी मराठा बांधवांनी खास व्हॅनिटी व्हॅन सज्ज केली आहे. या व्हॅनमध्ये सर्व सुविधा असणार आहेत.

गंगाधर काळकुटे

बीड येथील मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही खास व्हॅनिटी जरांगेंसाठी तैनात ठेवली आहे.

Vanity Van

''ज्यांनी समाजासाठी जीवाची पर्वा केली नाही, महाराष्ट्र पिंजून काढला; ते आता मुंबईकडे पायी चालणार आहेत. त्यांना रात्रीच्या मुक्कामासाठी, आरामासाठी आणि सुरक्षेसाठी ही व्हॅन असेल'' असं काळकुटेंनी सांगितलं.

सुविधा

या व्हॅनमध्ये सोफा, बेड, वॉशरुम, फ्रिज, ओव्हन यासह अनेक सुविधा आहेत. शिवाय सलाईन घेण्यासाठी आणि इतर आरोग्याच्या सुविधांसाठी व्हॅनमध्ये व्यवस्था आहे.

अंतरवाली सराटी

२० तारखेला अंतरवाली सराटी येथून निघणारा मोर्चा २६ तारखेला मुंबईत पोहोचणार आहे. मुंबईतील आझाद मैदान, शिवाजी पार्क आणि इतरही मैदानांमध्ये हे आंदोलन होईल

सरकार

मराठ्यांनी मुंबईच्या दिशेने कूच करु नये, यासाठी सरकारकडून शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले जात आहे. परंतु जरांगे पाटील भूमिकेवर ठाम आहेत.

त्रेता युगाच्या थीमवर सजणार अयोध्या नगरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ram-mandir-ayodhya-donation-box | esakal
<strong>येथे क्लिक करा</strong>