सकाळ डिजिटल टीम
दरवर्षी केरळमध्ये मातृभूमी इंटरनॅशनल फेस्टिवल ऑफ लेटर हा साहित्य महोत्सव होतो.
३१ जानेवारी २०१९ मध्ये झालेल्या या महोत्सवात लेखक आणि काँग्रेस खासदार शशी थरूर यांना आमंत्रण देण्यात आले होते.
त्यावेळी त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले, ज्यातील एक प्रश्न होता की जर ब्रिटिश आले नसते, तर भारताचा इतिहास कसा असता?
त्यावर थरूर यांनी सविस्तर उत्तर दिले होते. त्यांनी उत्तर देताना म्हटलेलं की ब्रिटीश नसते, तर भारतावर मराठ्यांचं राज्य असतं.
शशी थरूर यांनी हे स्पष्ट सांगितलं की एक देश म्हणून आपल्या सैन्याची ताकद मोठी नव्हती, त्यामुळे ब्रिटिश नसते तरी दुसऱ्या युरोपियन देशानं भारतावर राज्य केलं असतं.
तरी अशी कल्पना केली की तर भारतावर दुसऱ्या देशाचं राज्य नसतं, तर शशी थरूर म्हणाले, मराठा साम्राज्य त्यावेळी उत्तरेला दिल्लीपर्यंत, तर दक्षिणेला तंजावर पर्यंत पसरलेलं होतं. मुघलही मराठ्यांच्याच अधिपत्याखाली त्यावेळी होते.
पश्मिमेला तर मराठी साम्राज्यच होतं, पण पूर्वेकडेही कोलकातापर्यंत हे साम्राज्य पसरलेलं होतं.
पानिपतच्या लढाईनंतरही मराठा साम्राज्य वाढू शकलं असतं. त्यामुळे जर ब्रिटीश नसते तर भारतात मराठ्यांचं साम्राज्य असू शकलं असतं.