Monika Lonkar –Kumbhar
मराठी आणि हिंदी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी.
सोनाली कुलकर्णीला महाराष्ट्राची अप्सरा म्हणून ही ओळखले जाते.
आपल्या उल्लेखनीय अभिनयासोबतच सोनाली तिच्या अप्रतिम सौंदर्यासाठी आणि फिटनेससाठी खास करून ओळखली जाते.
मॉर्डन असो की पारंपारिक सोनाली प्रत्येक लूकमध्ये तितकीच कमाल दिसते.
सोनालीने नुकतेच या पिवळ्या रंगाच्या पैठणीत सुंदर फोटोशूट केले आहे.
या पैठणीच्या काठावर रंगीबेरंगी कमळांचे सुंदर वर्क करण्यात आले आहे. ही कमळाच्या फुलांची डिझाईन लक्ष वेधून घेत आहे.
या पैठणीत सोनाली कमाल दिसत असून तिचा एकूणच लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. या फोटोंवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला जात आहे.