Monika Lonkar –Kumbhar
मराठी आणि हिंदी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी.
सोनाली तिच्या उल्लेखनीय अभिनयासोबतच फॅशन सेन्साठी ही ओळखली जाते. मॉर्डन असो वा पारंपारिक सोनाली प्रत्येक लूकमध्ये तितकीच सुंदर दिसते.
नुकतेच सोनालीने या निळ्या रंगाच्या पैठणी साडीत सुंदर फोटोशूट केले आहे. तिने एका विवाहसोहळ्यासाठी हा खास लूक केला होता.
या निळ्या रंगाच्या पैठणीत सोनाली खूपच सुंदर दिसतेय.
खास करून सोनालीची ही सुंदर नथ चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या नथीमुळे सोनालीच्या लूकला चारचाँद लागले आहेत.
या पैठणीवर सोनालीने मराठमोळी ज्वेलरी, झुमके, नथ आणि बांगड्यांचा साज केला आहे.
सोनालीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.