Monika Lonkar –Kumbhar
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारी अभिनेत्री आश्विनी भावे. 'हिना' या गाजलेल्या चित्रपटातून त्यांनी हिंदी कलाविश्वात पदार्पण केले होत. त्यानंतर, त्यांनी मागे वळून पाहिले नाही. 'अशी ही बनवाबनवी' शाबास सूनबाई हे त्यांचे गाजलेले मराठी चित्रपट आहेत.
मराठी आणि हिंदी कलाविश्वात आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या वर्षा उसगावकर यांनी तिरंगा, दूध का कर्ज, साथी, इत्यादी गाजलेल्या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. मराठी चित्रपटसृष्टी तर त्यांच्याशिवाय अपूर्ण आहे.
मराठी आणि हिंदी कलाविश्वातील दिग्गज अभिनेत्री म्हणून रोहिणीताईंना ओळखले जाते. रोहिणी हट्टंगडी यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'अरविंद देसाई की अजीब दास्तान' 'सारांश', 'आघात', 'लडाई', 'अग्निपथ' हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत.
मराठी आणि हिंद चित्रपटसृष्टी गाजवणारी अभिनेत्री म्हणून सोनाली कुलकर्णीला ओळखले जाते. सोनालीने गुलाबरी या चित्रपटातून हिंदी कलाविश्वात पदार्पण केले होते. दिल चाहता है, पोस्टर बॉईज इत्यादी चित्रपटांमध्ये तिने प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.
'चंद्रमुखी' फेम अभिनेत्री अमृता खानविलकरने मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीत तिच्या अभिनेयाचा डंका वाजवला आहे. अमृताने मुंबई सालसा,फूंक, फूंक २, राजी, सत्यमेव जयते इत्यादी गाजलेल्या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकरने मराठीसोबतच बॉलिवूडमध्ये तिच्या अभिनयाची छाप पाडली आहे. सईने नुकत्याच रिलीज झालेल्या भक्षक, मिमी, हंटर, इंडिया लॉकडाऊन इत्यादी गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
धमाका, गलीबॉय, अस्तू, व्हाईट रेनबो, इत्यादी गाजलेल्या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. यासोबतच अमृताने अनेक मराठी चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.