Amit Ujagare (अमित उजागरे)
टाइम प्लीज, डबल सीट, धुरळा, आनंदी गोपाळ सारखे दर्जेदार सिनेमा बनवणारा निर्माता-दिग्दर्शक समीर विद्वांस लग्नबंधनात अडकला.
आपली मैत्रिण आणि सहाय्यक दिग्दर्शक जुईल सोनलकरसोबत त्यानं जन्मोजन्मीची लग्नगाठ बांधली.
स्वतः जुलईलीनं आपल्या लग्नाचे फोटो इन्स्टावर शेअर केले आहेत.
याचवर्षी फेब्रुवारी महिन्यात समीर विद्वांस आणि जुईली सोनलकर यांनी साखरपुडाही केला होता.
व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी समीरने सोशल मिडीयावर साखरपुड्याचा फोटोही शेयर केला होता.
समीर आणि जुईलीनं सन २०१७मध्ये 'मला काही प्रॉब्लेम नाही' या चित्रपटासाठी एकत्र काम केलं होतं.
आपल्या चित्रपटांच्या आयुष्यापेक्षा वेगळ्या आयुष्यात आता या जोडीनं प्रवेश केला आहे.