संतोष कानडे
अनेक थोरामोठ्यांनी काही दशपांकापासून यासाठी प्रयत्न केले होते, ते अखेर गुरुवारी शक्य झाले.
विवेकसिंधु हा ग्रंथ शके १११० मध्ये आद्यकवी मुकुंदराज यांनी रचला होता. हा ग्रंथ मराठी भाषेतला पहिला ग्रंथ आहे.
आद्यकवी मुकुंदराज हे मुळचे बीड जिल्ह्याचे
बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई येथे मुकुंदराजांनी विवेकसिंधु या ग्रंथाची रचना केली.
ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्माच्या आधी मुकुंदराजांनी समाधी घेऊन ७५ वर्षे झाली होती.
त्यांनी त्यांच्या विवेकसिंधु या ग्रंथामध्ये शंकराचार्यांच्या वेदांतावर निरुपणात्मक विवेचन केले.
या ग्रंथामध्ये एकूण १८ ओवीबद्ध प्रकरणे आहेत.
मुकुंदराज यांनी परमामृत हा दुसरा मराठी ग्रंथ रचला.