अनंत-राधिकाच्या रिसेप्शनला 'या' मराठमोळ्या गायिकेची हजेरी

सकाळ डिजिटल टीम

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या ग्रँड रिसेप्शनला अनेक कलाकारांनी हजेरी लावत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी एका मराठी गायिकेनेही तिच्या पतीबरोबर या सोहळ्याला हजेरी लावली.

Priyanka Barve

प्रियांका बर्वे

ही मराठी गायिका आहे प्रियांका बर्वे. प्रियांकाने तिचा पती सारंगसोबत या रिसेप्शनला हजेरी लावून नवविवाहित दांपत्याला शुभेच्छा दिल्या.

Priyanka Barve

सोशल मीडिया

प्रियांकाने सोशल मीडियावर या रिसेप्शनच एक छोटंसं रील शेअर केलं.

Priyanka Barve

दिग्गजांचे परफॉर्मन्स

तिने यावेळी दिग्गज गायकांचे परफॉर्मन्स एन्जॉय केले आणि अंबानी कुटूंबाच्या आदरतिथ्याचा आस्वाद घेतला.

Priyanka Barve

सुंदर लूक

प्रियांकाच्या लूकनेही सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. तिने राखाडी रंगाची साडी, पिवळ्या रंगाचा ब्लाउज आणि त्यावर डायमंड ज्वेलरी असा लूक केला होता. यात ती खूप सुंदर दिसत होती.

Priyanka Barve

अमृता खानविलकर

यावेळी तिच्या मराठी इंडस्ट्रीमधील मित्रांची भेट घेत त्यांच्याबरोबर सेल्फी काढले. अभिनेत्री अमृता खानविलकरबरोबरही तिने फोटो काढला.

Priyanka Barve

जितेंद्र जोशी

अभिनेता जितेंद्र जोशीनेही या रिसेप्शनला हजेरी लावली होती. तिचा आणि जितेंद्र जोशीचा सेल्फी चर्चेत आहे.

Priyanka Barve
amruta and girija
अमृता-गिरिजाचा खास अंदाज - येथे क्लिक करा