सकाळ डिजिटल टीम
17 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशी वारकऱ्यांसाठी सर्वात मोठा उत्सव असतो.
आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात. या निमित्ताचे औचित्य साधून खास मराठमोळे उखाणे.
आषाढी एकादशीला करावी विठ्ठलाची वारी राव आहेत माझे खूपच भारी
उखाणा ऐकायला सर्व करतात खूप घाई राव माझे विठ्ठल मी त्यांची रखुमाई
पंढरपूरमध्ये आहे रखुमाई आणि विठोबा, रावांचे नाव घेते कार्यक्रमाला आली शोभा
टाळ मृदंग वाजवत मुखी विठ्ठलाचे नाम मी रावांची सीता ते माझे राम
खोक्यात खोके खोक्यात कपबशी रावांचं नाव घेते आज आहे आषाढी एकादशी
आषाढी एकादशीला करु विठ्ठलाची वारी रावांचं नाव घेते बोला विठ्ठल विठ्ठल जय हरी