Anuradha Vipat
भूषणचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘जुनं फर्निचर’ या भूषणच्या आगामी सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच पार पडला.
या ट्रेलर लाँच सोहळ्यात भूषणने एक खास गोष्ट प्रेक्षकांसोबत शेअर केली आहे
आईबाबांसोबत असणारं त्याचं नातं यावेळी भूषणने प्रेक्षकांसमोर मांडलं आहे
भूषण त्यांच्या आईबाबांना रोज आवर्जून फोन करतो. रोज फोन करण्यामागचं कारणही त्याने सांगितलं आहे.
आईवडिलांना नक्की काय हवं आहे, हे आपल्याला- मुलांना कळतच नाही. आई-वडिलांकडे दुर्लक्ष होता कामा नये. याची जाणीव मला हा चित्रपट करताना झाली. म्हणूनच मी घराच्या बाहेर असताना आई-बाबांना नित्यनियमाने फोन करतो असं भूषण म्हणाला.