Pranali Kodre
आयपीएल 2024 स्पर्धेत 39 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध 6 विकेट्सने विजय मिळवला.
चेन्नईने दिलेल्या २११ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनौला अखेरच्या षटकात रोमांचक विजय मिळवून देण्यात मार्कस स्टॉयनिसने मोलाचा वाटा उचलला.
मार्कस स्टॉयनिसने 63 चेंडूत सर्वाधिक 124 धावांची नाबाद खेळी केली.
दरम्यान, स्टॉयनिस आयपीएलमध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वोच्च वैयक्तिक खेळी करणारा खेळाडू ठरला आहे.
त्याच्याआधी हा विक्रम पॉल वॉल्थटीच्या नावावर होता. त्याने 2011 मध्ये मोहालीच चेन्नईविरुद्ध पंजाब किंग्सकडून धावांचा पाठलाग करताना नाबाद 120 धावांची खेळी केली होती.
वॉल्थटी पाठोपाठ या यादीत विरेंद्र सेहवाग आणि संजू सॅमसन आहे. सेहवागने दिल्ली कॅपिटल्सकडून 2011 मध्ये डेक्कन चार्जर्सविरुद्ध धावांचा पाठलाग करताना 119 धावांची खेळी केली होती.
सॅमसनने राजस्थान रॉयल्सकडून मुंबईमध्ये 2021 मध्ये पंजाब किंग्सविरुद्ध धावांचा पाठलाग करताना 119 धावांची खेळी केली होती.
त्यांच्यानंतर या यादीत शेन वॉटसनही असून त्याने 2018 आयपीएलच्या अंतिम सामन्यात चेन्नईकडून सनरायझर्स हैदराबादविरुद्ध धावांचा पाठलाग करताना 117 धावांची नाबाद खेळी केलेली.