सकाळ डिजिटल टीम
ग्लोइंग स्किनसाठी बायका वेगवेगळ्या ट्रिटमेंट घेत असतात. तरी मनासारखा रिझल्ट मिळत नाही. तेव्हा आजीच्या काळातला हा उपाय एकदा करून बघा.
जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्याचा ग्लो कायम ठेवायचा असेल तर तुम्ही झेंडूच्या फुलाचा फेस मास्क तुमच्या चेहऱ्यावर अप्लाय करू शकता.
झेंडूच्या फुलांची पेस्ट आणि तांदळाचे पीठ मिक्स करा. तांदळाच्या पिठाने चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होतात.हा फेस मास्क बनवण्यासाठी तुम्हाला कोकोनट ऑइल आणि लिंबूची आवश्यकता आहे.
आइली स्किनसाठी बेसन आणि झेंडूच्या फुलांची पेस्ट जास्त फायदेशीर आहे. हा फेस पॅक बनवण्यासाठी तुम्हाला झेंडूची फुलं, कोकोनट ऑइल, १ मोठा चमचा बेसन आणि १ चमचा कच्चं दूध याची आवश्यकता असेल.
उन्हाळ्यात चेहऱ्यावर चंदन लावल्याने आतून थंड वाटतं. हा फेस पॅक बनवण्यासाठी झेंडूचे फूल, चंदन आणु गुलाब जल लागेल.
त्वचेचे सौंदर्य जपण्यासाठी लोक एलोवेराचा वापर करतात. यात झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या मिक्स करून २० मिनिटे चेहऱ्यावर ठेवा. तुम्हाला रिझल्ट मिळेल.
हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतो. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या कमी होते. तुम्ही झेंडूच्या पाकळ्यांमध्ये हळद मिक्स करून चेहऱ्याला लावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.