Pranali Kodre
नॉटिंगहॅम येथे इंग्लंड आणि वेस्ट इंडीज संघात १८ जुलैपासून दुसरा कसोटी सामना सुरू झाला.
या सामन्यात इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये वेगवान गोलंदाज मार्क वूडलाही संधी मिळाली.
दरम्यान, त्यानेही मिळालेल्या संधीचा फायदा घेत मोठा विक्रम केला आहे.
मार्क वूडने त्याच्या पहिल्याच षटकात 93.9 mph (151.1 km/h) 95.2 mph (152.88 km/h),92.2 mph (148.06 km/h), 96.5 mph (155.30 km/h), 95.2 mph (153.20 km/h) या वेगाने चेंडू टाकले.
वूडने त्याचे दुसरे षटकही वेगवान टाकले. पण त्याचं तिसरं षटक विक्रमी ठरलं.
वूडने तिसऱ्या षटकात 95 mph (152 km/h), 93 mph (149.66 km/h), 95 mph (152 km/h), 96 mph (154.49 km/h), 97.1 mph (156.26 km/h), 94 mph (151.27 km/h) वेगाचे चेंडू टाकले.
त्यामुळे, २००६ पासून जेव्हा वेग रेकॉर्ड व्हायला लागला, तेव्हापासूनचा तो इंग्लंडचा घरच्या मैदानात कसोटीमध्ये सर्वात वेगवान षटक टाकणारा गोलंदाज ठरला आहे.
या विक्रमाच्या यादीत त्याचं तिसरं षटक अव्वल क्रमांकावर आणि त्याचं पहिलं षटक दुसऱ्या क्रमांकावर आहे.