सकाळ डिजिटल टीम
लग्नाला आजही भारतीय समाजात अनन्यसाधारण महत्त्व आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात लग्न कसे होत होते, हे थोडक्यात जाणून घेऊ.
शिवकाल या पुस्तकात याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार वर आणि वधू यांच्या बाजूचे पुरोहित शुभदिवस आणि तास परस्पर संमंतीने निश्चित करत असत.
आत्ताच्या प्रमाणेच त्यावेळीही लग्नविधी केले जात होते. वाङ् निश्चय (साखरपुडाः), सीमान्तपूजन, मधुपर्क, आंतरपाट, सूत्रवेष्टन, लाजाहोम, सप्तपदी असे विधी केले जात.
लग्नाचा दिवस ठरवल्यानंतर निमंत्रणे पाठवण्यात येत. विवाहाच्या पूर्वसंध्येला सीमान्तपूजन केले जाई.
वाङ् निश्चय समारंभ रात्री होत असे. यावेळी नवऱ्यामुलाचे पालक आणि नातेवाईक नवरीच्या घरी पोषाख व दागिने घेऊन जात. त्यावेळी दोन्ही कुटुंब एकमेकांना नारळ देऊन भेट घेत.
लग्नाच्या दिवशी सकाळी हळदी समारंभ होत असे. नंतर वधूच्या घरी वरात घेऊन आल्यानंतर नवऱ्या मुलाला विवाह वेदीवर नेले जाई. त्यावेळी मंगलाष्टका म्हटल्या जात.
त्यानंतर कन्यादान आणि सप्तपदी या विधी होत.