Married Life : सर्व बायकांना नवऱ्याकडून हेच ऐकायला फार आवडतं!

धनश्री भावसार-बगाडे

आय लव्ह यू

आय लव्ह यू हे तीन शब्द लहान असले तरी यांच्यात ताकद फार मोठी आहे. हे शब्द नवऱ्याकडून ऐकायला फार आवडतं बायकांना. त्यामुळे नवऱ्याला आपली किंमत आहे, प्रेम आहे ही जाणीव होते.

Married Life | esakal

तू खूप सुंदर आहे

बायकोच्या दिसण्याचे कौतुक केलेले तिला फार आवडते. यामुळे तिचा आत्मविश्वास आणि आकर्षकता वाढवतो.

Married Life | esakal

थँक्यू

पत्नी घरासाठी फार काही करत असते. तिच्या कामाचं कौतुक आणि त्यासाठी आभार व्यक्त केल्याने तिला प्रोत्साहन मिळतं. अधिक उत्साहाने ती तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करते.

Married Life | esakal

मला तुझा अभिमान आहे

बायको जे करते त्याची नवऱ्याला कदर आहे, त्याला त्याचा अभिमान वाटतो हे जाणून बायकोला दहा हत्तींच बळ संचारल्यासारखं वाटतं.

Married Life | esakal

तुझा दिवस कसा होता?

रात्रीचा वेळ नवरा बायकोचा असतो. यावेळेत आजचा दिवस कसा होता याची नवऱ्याने आपुलकीने चौकशी केलेली तिला आवडते. आपल्या गोष्टीत त्याला सहभागी व्हायला आणि जाणून घ्यायला आवडते याची जाणिव मिळते.

Married Life | esakal

मी आहे ना

तुझ्या प्रत्येक अडचणीच्या वेळी मी आहे नी तुझ्यासाठी, काळजी करू नको हे आश्वासक शब्द तिला फार आधार देतात.

Married Life | esakal

तुझ्यामुळे घरा घरपण

बायको घराला प्रेम, जिव्हाळ्याने जपत असते. बरच काही करत असते. अशावेळी नवऱ्याचे हे शब्द तिने केलेल्या मेहनतीचं चीज झाल्याची भावना तिला देते.

Married Life | esakal

तूच माझी प्रेरणा

प्रत्येक बाईला आपण नवऱ्यासाठी प्रेरणा असावी असं वाटत असतं. अशावेळी तुझ्यासाठी आणि तुझ्यामुळे मला नवीन काही करण्याची प्रेरणा मिळते हे ऐकून ती सुखावते.

Married Life | esakal

माझा तुझ्यावर विश्वास आहे

आपण जे करतो ते नवऱ्याला पटतं आहे याचा विश्वास तिला फार बळ देत असतं. अशावेळी नवऱ्याचा आपल्यावर विश्वास आहे हे जाणून ती अधिक प्रयत्न करण्यास प्रोत्साहित होते.

Married Life | esakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Married Life | esakal