Swapnil Kakad
टोयोटा इनोव्हा हायक्रॉसवर आधारित इन्व्हिक्टो हि मारुती सुझुकीची आत्तापर्यंतची सर्वात एक्सपेन्सिव्ह कार आहे.
कारच्या फ्रंट-एन्डला ग्रिलमध्ये हॉरीझॉन्टल स्लेट्स दिले आहेत जे हेडलॅम्प्सपर्यंत एक्सटेन्ड होतात. ह्या कारचे अलॉय व्हील्स हायक्रॉसपेक्षा वेगळे आहेत.
कारचे इंटिरियर संपूर्ण ब्लॅक आणि कॉपर हायलाईटसोबत येते जे हायक्रॉसपेक्षा अतिशय वेगळे दिसते. इन्व्हिक्टो ६ आणि ७-सीटर अशा दोन्ही कॉन्फिगरेशनमध्ये येते.
हि कार १०.१ इंची टचस्क्रीन, पॅनोरॅमिक सनरूफ, ३६० डिग्री कॅमेरा, ७-इंची डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल अशा फीचर्ससोबत येते.
ह्या कारचे स्ट्रॉंग हायब्रीड पॉवरट्रेन २.०-लिटर, पेट्रोल + इलेक्ट्रिक मोटर १८४hp प्रोड्युस करते.
नेक्साची हे नवीन मॉडेल भारतीय बाजारात टोयोटा इनोव्हा हायक्रॉस, महिंद्रा XUV700, महिंद्रा स्कॉर्पिओ N, ह्युंदाई अल्काझार, MG हेक्टर प्लस, आणि टाटा सफारी ह्या गाडयांना टक्कर देण्यासाठी सज्ज आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.