Sudesh
देशातील सगळ्यात मोठी कार कंपनी म्हणून मारुती-सुझूकी ओळखली जाते.
या कंपनीने आपल्या दोन मोठ्या गाड्यांच्या किंमतीमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे.
कंपनीने यापूर्वीच इशारा दिला होता, की एप्रिलमध्ये गाड्यांच्या किंमती वाढतील. नव्या किंमती 10 एप्रिलपासून लागू झाल्या आहेत.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार मारुती सुझूकी स्विफ्टच्या किंमतीत 25 हजार रुपयांनी वाढ झाली आहे.
स्विफ्टची किंमत 5.99 लाख ते 9.03 लाखांच्या घरात आहे. कोणत्या व्हेरियंटच्या किंमतीत वाढ झाली आहे याबाबत माहिती समोर आलेली नाही.
मारुती सुझूकीने आपल्या ग्रँड व्हिटारा एसयूव्हीच्या सिग्मा व्हेरियंटची किंमतही वाढवली आहे.
या मॉडेलचं हे बेस व्हेरियंट आहे, ज्याची एक्स-शोरूम किंमत 10.76 लाख रुपये होती. आता ही किंमत 10.95 लाख रुपये झाली आहे.
कंपनीने ग्रँड व्हिटारा कारच्या इतर व्हेरियंटच्या किंमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही.