संतोष कानडे
येत्या ११ नोव्हेंबरला मारुती सुझुकीची स्विफ्ट डिझायर लाँच होत आहे
या गाडीला फाईव्ह स्टार रेटिंग मिळाल्याने ग्राहकांच्या भूवया उंचावल्या आहेत
मारुती सुझुकीच्या गाड्यांवर केवळ सुरक्षेच्या कारणास्तवर कानाडोळा केला जातो
तरीही भारतामध्ये सर्वाधिक ग्राहकांकडे मारुती सुझुकीच्याच गाड्या आहेत
त्यातही स्विफ्टवर लोकांचा भरवसा आहे. याच गाडीच्या चौथ्या जनरेशनला NCAP चं फाईव्ह स्टार सुरक्षा रेटिंग मिळालं आहे
नवीन जनरेशनच्या डिझायरमध्ये ४५ टक्के उच्च प्रतीचे स्टील वापरण्यात आलेले आहे
गाडीमध्ये सहा एअरबॅग, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, ABSसह EBD यंत्रणा आहे
मायलेजच्या बाबातीमध्ये AMT २५.७१ आणि मॅन्युअल २४.७९ इतकी क्षमता कंपनीने दिली आहे
गाडीमध्ये इलेक्ट्रिक सनरुफ, ३६० डिग्री सराऊंड कॅमेरा, ९ इंच टचस्क्रीन डिस्प्ले आहे