Monika Lonkar –Kumbhar
मसूर डाळ आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानली जाते.
दैनंदिन आहारात मसूर डाळीचा हमखास समावेश असतो. पोषकघटकांनी परिपूर्ण असलेली ही डाळ आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे.
मसूरडाळीपासून बनवलेला फेसपॅक त्वचेसाठी लाभदायी आहे. हा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्याने काय फायदे होतात? जाणून घेऊयात.
मसूरडाळीचा फेसपॅक चेहऱ्याला लावल्याने त्वचेचे उत्तम पोषण होते.
मसूरडाळीपासून बनवलेला फेसपॅक चेहऱ्याला लावल्याने मृत त्वचा निघून जाते.
मसूरडाळीचा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्याने त्वचेवर सुंदर ग्लो येतो.
मसूरडाळीचा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्याने पिंपल्स आणि डागांची समस्या दूर होण्यास मदत होते.