Anuradha Vipat
अभिनेत्री मयुरी देशमुखने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे.
या पोस्टद्वारे मयुरीने तिच्या खासगी आयुष्यासंदर्भात अफवा पसरवणाऱ्यांना इशारा दिला आहे.
काही दिवसांपूर्वी मयुरीने तिच्या एका जवळच्या मित्रासोबतचा फोटो पोस्ट केला होता.
हा फोटो पाहिल्यानंतर मयुरीच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या होत्या.
आता त्यावरच मयुरीने भलीमोठी पोस्ट लिहिली आहे.
पोस्टमध्ये मयुरीने लिहिलं आहे की, ‘जेव्हा तुमच्याबद्दल बिनबुडाची बातमी येते तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करणंच शहाणपणाचं ठरतं.
पुढे पोस्टमध्ये मयुरीने लिहिलं आहे की, जेव्हा नुकतंच माझ्या एका चांगल्या मित्राशी माझं नातं जोडणारी एक हास्यास्पद बातमी व्हायरली झाली, तेव्हा माझे मित्र, कुटुंबीय आणि त्याची पत्नीसुद्धाने हसून मला त्याकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला.