सकाळ डिजिटल टीम
देशातील कोळ्यांच्या यादीत आता आणखी एका कुळाची भर पडली आहे.
‘मेडमास्सा’, असे या कुळाचे नाव आहे.
‘मेडमास्सा सॅगॅक्स’ आणि ‘मेडमास्सा पोस्टिका’ अशा दोन नव्या प्रजातींचा शोध लावण्यात आला आहे.
४ एप्रिलला हा संशोधन अहवाल आंतरराष्ट्रीय जर्नल झूटॅक्सामधून प्रसिद्ध करण्यात आला, अशी माहिती संशोधक गौतम कदम, ऋषिकेश त्रिपाठी आणि प्रदिप संकरन यांनी दिली.
‘मेडमास्सा’ हे कुळ १८८७ ला पहिल्यांदा नोंदविण्यात आले होते.
या कुळातील नव्याने शोधलेल्या दोन्ही प्रजाती पश्चिम घाटातून नोंदविण्यात आल्या आहेत.
केरळमधील मुंडकायाम वरून ‘मेदामास्सा सॅगॅक्स’ आणि तमिळनाडूतील कन्याकुमारीमधून ‘मेदामास्सा पोस्टिका’ ही प्रजात नोंदविली गेली आहे.