साक्षी राऊत
राजस्थान राज्य त्यांच्या रंगीत कपड्यांसाठी, संस्कृतीसाठी आणि मसालेदार व्यंजनांसाठी ओळखले जाते. मात्र जोधपूरचा मेहरानगड किल्ला का खास आहे माहितीये? जाणून घेऊया कहाणी
या किल्ल्याचा इतिहास ५०० वर्षे जुना आहे. जोधपूरचा शासक राव जोधाने १४५९ मध्ये या किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात केली होती. आणि महाराज जसवंत सिंहने (१६३८-७८) या किल्ल्याचे बांधकाम पूर्ण केले.
मेहरानगड किल्लाच्या भिंती दूरवर म्हणजेच १० किमी पर्यंत पसरलेल्या आहेत. या किल्ल्याची उंची २० फूट ते ७० फूट पर्यंत आहे. तर भिंतीची रूंदी १२-७० फूट आहे. या किल्ल्यावरून जोधपूरबरोबरच पाकिस्तानही स्पष्ट दिसतं.
राजाराम मेघवालला श्रद्धांजली देण्यासाठी या किल्ल्यात त्यांच्या कबरीवर बलुआ खडकाने स्मारकही बांधले. या स्मारकावर काही माहिती खडकांवर कोरीव काम करून लिहीली गेली आहे.
या किल्ल्यात ७ दरवाजे आहेत. ज्याला पोल असे म्हटले जाते. यातील एका पोलचे निर्मिती महाराजा मान सिंहने १८०६ मध्ये जयपूर आणि बीकानेरमध्ये झालेले युद्ध जिंकण्याच्या आनंदात करण्यात आले होते.
या किल्ल्यात १५ पेक्षा जास्त राण्यांच्या हातांचे ठसे आहेत.
या किल्ल्यात शाही संग्रहालय आहे. ज्याला १४ खोल्या आहेत. या खोल्यांत शाही शस्त्रे, दागिने आणि काही कपडे ठेवण्यात आले आहेत.
या किल्ल्याच्या भागात बांधकामापूर्वी काही साधु राहत होते. जेव्हा किल्ल्याच्या बांधकामावेळी राजाने या साधुंना जाण्यास सांगितले तेव्हा तेव्हा साधुंनी राजास श्राप दिला. तू आयुष्यात सुखी राहू शकणार नाहीस असे ते म्हणाले.
नंतर राजाने साधुंची माफी मागितली आणि त्यास एक उपाय सांगितला. साधुंनी हा श्राप नष्ट करण्यासाठी कुठल्याही व्यक्तीस त्याच्या इच्छेने किल्ल्याखाली पुरून बळी देण्यास सांगितले.
डिस्क्लेमर - वरील लेख सामान्य माहितीवर आधारिक असून सकाळ समुह याची पुष्टी करत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.