Sudesh
कित्येक वेळा काही कारणामुळे आपला मूड ऑफ होतो. अशा वेळी बऱ्याच जणांना वाटतं, की काहीतरी खाल्ल्याने मूड चांगला होईल.
कित्येक जण अशा वेळी हा विचार करतात, की आपल्या आवडीची गोष्ट खाल्ल्याने मूड चांगला होईल.
मात्र, काही अशा गोष्टी आहेत ज्या खाल्ल्यामुळे तुमचा मूड आणखी बिघडू शकतो. या पदार्थांची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
कार्बन-सोडा आणि भरपूर प्रमाणात साखर असलेले कोल्ड्रिंक पिल्यामुळे तुमचा मूड आणखी खराब होऊ शकतो. तसंच, हे तुमच्या शरीरासाठीही हानीकारक आहे.
बटाट्याच्या चिप्समध्ये ओमेगा ६ फॅटी अॅसिड आढळतात. यामुळे ओमेगा ३ फॅटी अॅसिडचं प्रॉडक्शन थांबतं. ओमेगा ३ मुळेच तुमचा मूड सुधारू शकतो. त्यामुळे मूड खराब असताना चिप्स खाऊ नयेत.
कित्येकांना टाईमपास म्हणून खारवलेले शेंगदाणे खाण्याची सवय असते. मात्र, यामध्ये मोठ्या प्रमाणात सोडियम आढळतं. अशा शेंगदाण्यांच्या अती सेवनाने मूड स्विंग्स होऊ शकतात.
कॉफीमुळे आपला स्ट्रेस रिलीज होत असल्याचा दावा कित्येक जण करतात. मात्र, यातील कॅफेनमुळे आलेली ही तात्पुरती तरतरी असते. कॅफेनच्या अती सेवनाने अँग्झायटी आणि मूड स्विंग्स होऊ शकतात.
नॉन-ऑर्गॅनिक फळे किंवा भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कीटकनाशके आढळतात. यामध्ये वापरण्यात आलेल्या न्यूरोटॉक्सिनमुळे अँग्झायटी आणि मूड स्विंग्स होऊ शकतात.
पाव, ब्रेड अशा रिफाईंड कार्ब्समुळे शरीरातील शुक्रोजचं प्रमाण भरपूर वाढतं. यामुळे ताण-तणाव वाढू शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.