Sudesh
मोबाईलचा अति वापर घातक आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. मात्र, आजकाल सगळीच कामं मोबाईलवर होत असल्यामुळे तो न वापरणं केवळ अशक्य आहे.
मोबाईलच्या अति वापरामुळे कित्येक गंभीर आजारांची लागण होऊ शकते. यातीलच एक आजार म्हणजे नोमोफोबिया.
नोमोफोबिया या शब्दाचा अर्थ नो-मोबाईल-फोबिया असा होतो. यामध्ये एखाद्या व्यक्तीला स्मार्टफोनची एवढी सवय होऊन जाते, की त्याच्याशिवाय ती व्यक्ती राहूच शकत नाही.
जवळ मोबाईल नसल्यावर जर तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल, तर तुम्हालाही या आजाराची लागण होण्याची शक्यता आहे
तुम्हालाही जर असं वाटत असेल, की आपल्याला स्मार्टफोनची खूप सवय झाली आहे; तर काही गोष्टींची खबरदारी घेणं गरजेचं आहे.
फोनचा वापर केवळ गरज असतानाच करा. ज्या कामांसाठी स्मार्टफोनची गरज भासणार नाही, ती कामे करताना फोन दूर ठेवा.
सोशल मीडिया अॅप्सवर किती वेळ व्यतीत करायचा याचं लिमिट ठरवा. मोबाईल बाजूला ठेऊन पुस्तके वाचणे, पेंटिंग करणे किंवा इतर कोणत्याही छंदाला वेळ द्या.
मेडिटेशन किंवा योग अशा गोष्टींच्या मदतीने मोबाईलची सवय कमी करण्याचा प्रयत्न करा. तरीही मोबाईलचं व्यसन कमी होत नाही असं वाटल्यास तज्ज्ञांची मदत घ्या.