Sudesh
एमजी मोटर्सने या आठवड्यात JSW ग्रुपसोबत जॉइंट व्हेंचरची घोषणा केली.
या इव्हेंटमध्ये MG ने आपल्या नव्या इलेक्र्टिक स्पोर्ट्स कारला देखील शोकेस केलं.
एमजी सायबरस्टर (MG Cyberster) असं या कारचं नाव आहे. याचं डिझाईन प्रीमियम स्पोर्ट्स कारप्रमाणे आहे.
या कारला पूर्णपणे नवीन प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आलं आहे. या कारमध्ये स्मूद LED हेडलाईट्स आणि अपवर्ड स्वूपिंग स्प्लिट एअर इनटेक दिला आहे.
मागच्या बाजूला स्प्लिट रिअर डिफ्यूजर, बाणाच्या आकाराचे LED टेल लाईट्स दिले आहेत. तसंच यात रिझर डोअर्स दिले आहेत.
या कारमध्ये बिल्ट-इन 5G, वायरलेस चार्जर, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, व्हेंटिलेडेड सीट्स, मल्टिपल ड्रायव्हिंग मोड, प्रीमियम बोस ऑडिओ सिस्टीम, मल्टिपल एअरबॅग असे कित्येक फीचर्स आहेत.
या कारच्या एंट्री लेव्हल मॉडेलमध्ये 64kWh क्षमतेची बॅटरी मिळेल. याची रेंज सिंगल चार्जमध्ये 520 किलोमीटर एवढी असेल. तसंच 77kWh बॅटरीपॅकची रेंज 580 किमी असेल असा दावा कंपनीने केला आहे.
या कारची किंमत अद्याप घोषित करण्यात आलेली नाही. मात्र, ही एक परवडणारी स्पोर्ट्स कार असेल असं कंपनीने म्हटलं आहे. या कारची किंमत 50 हजार GBP (सुमारे 53 लाख रुपये) असू शकते असं म्हटलं जात आहे.