Anuradha Vipat
मिंलिंद गवळी हे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची मतं व्यक्त करत असतात.
नुकतीच त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर एक पोस्ट केली आहे.
तसेच त्यांनी सोशल मीडियावर पसरल्या जाणाऱ्या खोट्या वृत्तांविषयी देखील भाष्य केल आहे
पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “डोक्याचा भुगा” आजच्या तारखेला सगळ्यात फसव काय असेल तर सोशल मीडिया, त्यावर असलेल्या बातम्या, गोष्टी किती खऱ्या किती खोट्या आहेत हे तर परमेश्वरालाच माहित असतील.
पुढे मिंलिंद गवळींनी लिहिल आहे, आता इलेक्शन असल्यामुळे पुढार्यांची भाषणांचे व्हिडीओ तर खूपच पसरलेले आहेत. एखादा पुढारी दुसऱ्या एखाद्या पुढार्याच्या विरोधात बोलतो अशी क्लिप बघायला मिळते, पण मग प्रश्न पडतो त्यांची युती आहे मग त्या पुढाऱ्याच्या विरोधात का बोलला असेल ?
मग नंतर लक्षात येते की त्या पुढार्याची ती क्लिप फार जुनी आहे, ज्या वेळेला ते एकमेकांच्या विरोधात होते तेव्हा , पण आता मात्र त्यांची युती आहे,आता ते एकमेकांचं कौतुक करत आहेत,
काय खरं काय खोटं हे कळायलाच मार्ग नाही. असं पुढे मिंलिंद गवळींनी लिहिल आहे