Anuradha Vipat
अभिनेते मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असतात.
वेगवेगळ्या पोस्ट मिलिंद गवळी शेअर करत असतात.
आताही मिलिंद गवळी यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे
'आई कुठे काय करते' मालिकेच्या शुटिंगवर त्यांनी पोस्ट लिहिली आहे.
कोणाची हिंमत झाली नाही पण कांद्याने रडवलं असं मिलिंद गवळी यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
पुढे मिलिंद गवळी यांनी म्हटलं आहे की, स्वयंपाक करणं म्हणजे काय रॉकेट सायन्स नाहीये.
पुढे मिलिंद गवळी यांनी म्हटलं आहे की, कोणीही करू शकतं अशी त्याची धारणा होती पण प्रत्यक्षात त्याला जेव्हा स्वयंपाक करायला लागला त्यावेळेला त्याला ही जाणीव झाली की हे काय फार सोपं नाहीये.