Anuradha Vipat
अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतने तिच्या एका जुन्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल पश्चात्ताप व्यक्त केला आहे.
2017 मध्ये मीराने 'वर्किंग आई'बद्दल हे वक्तव्य केलं होतं.
मुलांसोबत वेळ घालवू शकत नाही मग त्यांना जन्मालाच का घालता, असा सवाल तिने केला होता.
आता काम करणाऱ्या आईंबद्दल मनात गैरसमज बाळगला होता, अशी कबुली तिने दिली आहे.
“माझ्या वक्तव्याकडे सकारात्मक दृष्टीकोनातून का पाहिलं गेलं नाही, हे मी समजू शकते असं मिरा म्हणाली आहे
माझ्या वक्तव्यामुळे बऱ्याच लोकांची मनं दुखावली गेली. त्यामुळे मला त्याचं खूप वाईट वाटत असं ती पुढे म्हणाली आहे
एका मुलाखतीत काम करणाऱ्या महिलांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे मीरा टीकाकारांच्या निशाण्यावर आली होती.