Anuradha Vipat
चित्रपट निर्माता करण जोहर सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.
करण जोहरने अचानक न्यायालयात धाव घेतली आहे.
आपल्या नावाचा गैरवापर होत असल्याची याचिका करणने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
‘शादी के डायरेक्टर करण और जोहर’ या चित्रपटावर करणने बंदी घालण्याची मागणी केली आहे.
हा चित्रपट १४ जून रोजी रिलीज होणार आहे.
करणने आपल्या याचिकेत असं लिहिलं आहे की, चित्रपटाच्या नावावरून त्याची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
या चित्रपटाच्या प्रदर्शनावर तात्काळ बंदी घालण्यासाठी न्यायमूर्ती आर. आय. छागला यांच्या खंडपीठासमोर खटला सादर करण्यात आला आहे