साक्षी राऊत
धावपळीच्या आयुष्यात स्वत:ची योग्य काळजी न घेतल्याने बऱ्याच लोकांचे आरोग्य आणि प्रजनन क्षमता प्रभावित होताना दिसते. कमी होणारा स्पर्म काउंट आणि शारीरिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी लसूण आणि मधाचे मिश्रण फायदेशीर ठरू शकते. वाचा फायदे.
मध आणि लसणाच्या मिश्रणात अँटीऑक्सिडंट्स आणि म्लूटाथिओन नावाचे तत्व भरपूर प्रमाणात असतात. रोज या मिश्रणाचे सेवन केल्याने अशक्तपणा दूर होतो.
मध आणि लसणाचे मिश्रण रोज प्यायल्याने पुरुषांमध्ये प्रजनन क्षमता वाढते. हे मिश्रण पुरुषांमधील लैंगिक क्षमता सुधारते आणि स्पर्म काउंट वाढवते. ज्यामुळे पुरुषांची प्रजनन क्षमता सुधारते.
स्वप्नदोषाची समस्या असेल तर अशा स्थितीत तुम्ही मध आणि लसणाचे मिश्रण फायदेशीर ठरते. स्वप्नदोषातून मुक्ती हवी असेल तर झोपण्याआधी लसूण आणि मध एकत्र खाणे फायदेशीर ठरते.
लसणात नायट्रोजन ऑक्साइड आणि एचटूएस सारखे एजंट असतात. जे ब्लड प्रेशर लेव्हल कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत करतात. मधासह लसणाचे नियमित सेवन केल्यास ब्लड क्लॉटिंगच्या समस्येतूनही आराम मिळतो.
लसणात एलिसिन नावाचा कंपाउंड असतो, जो किडनीतील स्थूलता आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस दूर करण्यास मदत करते. रोज मध आणि लसूण खाल्ल्याने किडनीचे आरोग्य चांगले राहते.
लसूण आणि मधाचे सेवन केल्याने पुरुषांची शारीरिक क्षमता वाढते. मध आणि लसूण मिक्स करून खाल्ल्यास लैंगिक समस्या दूर केली जाऊ शकते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.