सकाळ डिजिटल टीम
खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचं आज निधन झालं. ते 74 वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते.
न्यूमोनिया झाल्याने काल (30 जानेवारी 2024 रोजी) दुपारी सांगलीतील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान बाबर यांचं निधन झालंय.
अनिल बाबर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आमदार म्हणून ओळख होती. शिवसेनामध्ये फूट पडल्यानंतरही अनिल बाबर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता.
सांगलीच्या खानापूर मतदारसंघाचे अनिल बाबर प्रतिनिधित्व करत होते. अनिल बाबर यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत सदाशिव पाटील यांचा पराभव केला होता. अनिल बाबर हे 2019 मध्ये शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले होते.
अनिल बाबर यांनी काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेस आणि तिथून शिवसेना असा राजकीय प्रवास केला. कारकिर्दीच्या शेवटच्या वर्षांमध्ये ते मुख्यमंत्री शिंदेंशी एकनिष्ठ राहिले.
अनिल बाबर यांची ही आमदार म्हणून चौथी वेळ होती. 1990, 1999, 2014, 2019 ची आमदारकीची निवडणूक ते जिंकले. टेंभू योजना पूर्णत्वाकडे नेण्यात त्यांचा मोलाचा वाटा मानला जातो. गेल्यावर्षीच बाबर यांच्या पत्नी शोभा बाबर यांचं निधन झालं होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.