आठवड्यातून किती वेळा रिस्टार्ट करावा स्मार्टफोन?

Sudesh

स्मार्टफोन

दिवसभरात आपण कित्येक गोष्टींसाठी स्मार्टफोनचा वापर करतो. मेसेजिंग, कॉलिंग, सोशल मीडिया सर्फिंग, फोटोग्राफी अशी कामं आपण करतो.

Smartphone Tips | eSakal

ब्रेक

आपल्याला गाड्यांना जशी वेळोवेळी सर्व्हिसिंगची गरज असते, तशीच आपल्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसेसनाही रिस्टार्ट होण्याची गरज असते.

Smartphone Tips | eSakal

स्मार्टफोनचं आयुष्य

तुमच्या स्मार्टफोनचं आयुष्य हे तुमच्या काही सवयींवर अवलंबून असतं. स्मार्टफोन अधिकाधिक टिकावा यासाठी तो रिस्टार्ट करणं गरजेचं आहे.

Smartphone Tips | eSakal

फायदा

स्मार्टफोन रिस्टार्ट केल्यानंतर मोबाईल हँग होण्याचं प्रमाण कमी होतं. तसेच, वेळोवेळी स्मार्टफोन रिस्टार्ट केल्यास सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअर इश्यूही कमी येतात.

Smartphone Tips | eSakal

सर्व डिव्हाईसना फायदा

तुम्ही लॅपटॉप, टॅबलेट अशा इतर डिव्हाईसनाही वेळोवेळी रिस्टार्ट करणं गरजेचं असतं. डिव्हाईस हँग झाल्यानंतर देखील रिस्टार्ट करण्याचाच सल्ला दिला जातो.

Smartphone Tips | eSakal

स्मार्टफोनला फायदा

स्मार्टफोन रिस्टार्ट केल्यानंतर तो डिव्हाईसची कॅशे मेमरी क्लिअर करतो. एखादे मालफंक्शन करणारे अ‍ॅप बंद केलं जातं. सोबतच, नेटवर्क आणि बॅटरी देखील ऑप्टिमाईज केली जाते.

Smartphone Tips | eSakal

किती वेळा करावा?

तज्ज्ञांच्या मते आठवड्यातून कमीत कमी तीन वेळा स्मार्टफोन रिस्टार्ट करणे गरजेचं आहे. यामुळे मोबाईलचं आयुष्य वाढण्यास फायदा होतो.

Smartphone Tips | eSakal

वेगळं मत

तर, मोबाईल कम्युनिकेशन कंपनी टी-मोबाईलने म्हटलंय की आयफोन आणि अँड्रॉईड मोबाईल आठवड्यातून एकदा तरी रिस्टार्ट करावाच.

Smartphone Tips | eSakal

सॅमसंग

सॅमसंग कंपनीने म्हटलंय की त्यांचे गॅलेक्सी सीरीजमधील फोन हे दररोज रिस्टार्ट केले पाहिजेत. यासाठी सॅमसंग गॅलेक्सी मोबाईलमध्ये ऑटो रिस्टार्ट सेटिंगचा पर्यायही मिळतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Smartphone Tips | eSakal