Pranali Kodre
पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश संघात कसोटी मालिकेतील पहिला सामना रावळपिंडी येथे २१ ऑगस्टपासून खेळवला गेला.
या सामन्यात पाकिस्तानने पहिला डाव ११३ षटकात ६ बाद ४४८ धावांवर घोषित केला.
पाकिस्तानकडून सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या मोहम्मद रिझवानने २३९ चेंडूत ११ चौकार आणि ३ षटकारांसह १७१ धावांची खेळी केली.
त्यामुळे आता रिझवान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेत सहाव्या क्रमांकावर सर्वोच्च वैयक्तिक खेळी करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने बेन स्टोक्सचा विक्रम मागे टाकला आहे.
बेन स्टोक्सने २०२३ मध्ये लॉर्ड्सवर झालेल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध सहाव्या क्रमांकावर खेळचाना १५५ धावांची खेळी केली होती.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेत सहाव्या क्रमांकावर सर्वोच्च वैयक्तिक खेळी करणाऱ्या खेळाडूंमध्ये तिसऱ्या क्रमांकावर जॉस बटलर आहे. त्याने पाकिस्तानविरुद्ध साऊथॅम्पटन येथे २०२० मध्ये १५२ धावांची खेळी केली होती.
या विक्रमाच्या यादीत चौथ्या क्रमांकावर काईल मेयर्स आहे. त्याने बांगलादेशविरुद्ध २०२२ मध्ये ग्रॉस आयलेट येथे १४६ धावांची खेळी केली होती.
या विक्रमाच्या यादीत पाचव्या क्रमांकावर क्विंटन डी कॉक असून त्याने वेस्ट इंजिजविरुद्ध ग्रॉस आयलेट २०२१ मध्ये सहाव्या क्रमांकावर खेळताना नाबाद १४१ धावांची खेळी केली.