Amit Ujagare (अमित उजागरे)
1) स्टार क्रिकेटर मोहम्मद शमी यानं नवा हेअर कट केला आहे.
2) नव्या हेअर कटमुळं सध्या शमीची चांगलीच चर्चा असून, यापूर्वी काही प्रमाणात टक्कल पडलेला शमी आता चांगले केस उडवताना दिसतो आहे.
3) शमीचा एक व्हिडिओ समोर आला असून यामध्ये तो नव्या लूकमध्ये दिसतो आहे.
4) शमीनं फेमस हेअर स्टायलिस्ट आलिम हकीमकडून नवा हेअर कट करुन घेतला आहे. त्याचा हा हेअर कट बॉलिवूडच्या अॅनिमल चित्रपटातील लूक सारखा आहे.
5) काही महिन्यांपूर्वी शमीनं आपली हेअर लाईन दुरुस्त करण्यासाठी हेअर ट्रान्सप्लान्टही केलं होतं.
6) आलिम हकिमनं यापूर्वी विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनीचा देखील हेअर कट केला आहे.
7) शमीचा हा नवा हेअर कट त्याच्या चाहत्यांना देखील भलताच आवडला आहे. पण आता या हेअर कटसाठी किती खर्च आला याची चर्चा रंगली आहे.
8) आलिम हकीम हा हेअर स्टायलिश एका सेशनसाठी सुमारे १ लाख रुपये फी घेतो.