Anuradha Vipat
टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी व तिचा पती विवेक दहिया इटलीमध्ये फिरायला गेले होते
बुधवारी फ्लॉरेन्समध्ये त्यांचे सामान व पैसे चोरी झाले आहे
चोरट्यांनी गाडीच्या खिडक्या फोडून त्या दोघांचे पासपोर्टही नेले.
आता विवेक व दिव्यांका तिथेच अडकून पडले आहेत.
या प्रकरणी दिव्यांकाने इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याकडे मदत मागितली आहे.
चोरट्यांनी कारची काच फोडून त्यांचे पासपोर्ट, पर्स, पैसे, खरेदी केलेल्या वस्तू आणि जवळच्या मौल्यवान वस्तू असे १० लाख रुपयांचे सामान चोरून नेले आहे
दिव्यांकाने सोशल मीडियावरून मेलोनी यांना मदत मागितली आहे.