Cloths Bad Smell : पावसाळ्यात कपड्यांना येणारा कुबट वास घालवा झटकन! जाणून घ्या या टिप्स पटकन....

सकाळ डिजिटल टीम

एकदा कपड्यांना वास यायला लागला की तो कसा घालवायचा असा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो

Bad Smell of Cloths in Monsoon | esakal

कपड्यांचा हा वास सहज जाणारा नसतो.

Bad Smell of Cloths in Monsoon | esakal

अंगात घातल्यावर अंगालाही त्याचा वास येतो आणि आपल्या आजुबाजूच्यांनाही अगदी सहज हा वास येऊ शकतो.

Bad Smell of Cloths in Monsoon | esakal

कपड्यांना येणारा हा कुबट वास घालवण्यासाठी नेमके काय करायचे हे समजून घेऊया.

Bad Smell of Cloths in Monsoon | esakal

मीठ

कपाटात एका कोपऱ्यात मिठानं भरलेली पिशवी ठेवावी. ही पिशवी कपड्यांचा ओलावा शोषून घेण्यास उपयुक्त असते. सुती कापडाच्या पुरचुंडीत मीठ ठेवले तरी चालते.

Bad Smell of Cloths in Monsoon | esakal

कडुनिंबाची पाने

कडुनिंबाच्या पानांना आयुर्वेदात नैसर्गिक जंतुनाशक म्हणून महत्त्व आहे. ओलाव्यामुळे येणारी बुरशी किंवा जंतूंचा प्रसार टाळण्यासाठी पानांचा चांगला उपयोग होतो.

Bad Smell of Cloths in Monsoon | esakal

बेकिंग सोडा

बेकिंग सोडा वापरून पावसाळ्याच्या दिवसांत धुतलेल्या कपड्यांना येणारी दुर्गंध दूर करता येते. पाण्यात १ चमचा खाण्याचा सोडा टाकावा आणि त्यात कपडे भिजत घालावे.

Bad Smell of Cloths in Monsoon | esakal

व्हिनेगर

व्हिनेगर कपड्यांचा वास जाण्यासाठी उपयुक्त असते. दुर्गंधीयुक्त बॅक्टेरिया मारण्यासाठी व्हिनेगर चांगले कार्य करते.

Bad Smell of Cloths in Monsoon | esakal

फॅब्रिक कंडीशनर

बाजारात कपड्यांना सुगंध यावा यासाठी फॅब्रिक कंडिशनर मिळतात. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत हे कंडिशनर आवर्जून वापरायला हवेत.

Bad Smell of Cloths in Monsoon | esakal

हे टिप्स तुम्हाला कसे वाटले आम्हला नक्कीच सांगा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bad Smell of Cloths in Monsoon | esakal