Monika Lonkar –Kumbhar
बिघडलेल्या जीवनशैलीमुळे शरीरात विषारी घटक जमा होऊ लागतात. त्यामुळे, वेळोवेळी शरीर डिटॉक्स करणे, महत्वाचे आहे.
शरीराचे डिटॉक्सिफिकेशन केल्याने शरीर आतून स्वच्छ होते आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
पावसाळ्यात हेल्दी डिटॉक्स ड्रिंक्सचा आहारात समावेश करणे, महत्वाचे आहे.
कोणते आहेत हे हेल्दी डिटॉक्स ड्रिंक्स? चला तर मग जाणून घेऊयात.
चहा प्यायला अनेकांना आवडतो. पावसाळ्यात सामान्य दुधाचा चहा पिण्याऐवजी तुम्ही हर्बल चहा देखील पिऊ शकता.
बीटरूट आणि आल्याचा रस हे दोन्ही प्रमुख घटक आपल्या शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करतात.
तुम्ही लिंबू आणि आल्याचा चहा पिऊ शकता. हा चहा पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो तसेच, यामुळे, बॉडी डिटॉक्सिफिकेशन चांगल्या प्रकारे होते.