अंकिता खाणे (Ankita Khane)
पावसाळ्यातील ओलाव्यामुळे हिरव्या पालेभाज्यांमध्ये जंतू वाढण्याचा धोका असतो.
पावसाळ्यात कच्च्या भाज्यांऐवजी वाफवलेल्या किंवा उकडलेल्या भाज्या खाणं फायदेशीर ठरेल. कारण कच्च्या भाज्यांमध्ये बॅक्टेरिया आणि विषाणू असतात ज्यामुळे पोटाची समस्या होऊ शकते.
सामान्य दिवसांमध्ये, हे जंतू कडक सूर्यप्रकाशात मरतात किंवा निष्क्रिय होतात, परंतु पावसाळ्यात ते अधिक सक्रिय असतात.
वांगी पावसाळ्याच्या दिवसांत वांग्यामध्ये किडे होण्याची शक्यता असल्याने या काळात वांगी खाणे टाळावे. या काळात वांगी खाल्ल्याने खाज सुटणे, त्वचेवर चट्टे उठणे, पोटातील संसर्ग अशाप्रकारच्या समस्या उद्भवू शकतात.
पावसाळ्याच्या दिवसांत फ्लॉवरमध्ये किडे होण्याची शक्यता असल्याने या काळात फ्लॉवर खाणे टाळावे.
मशरूम ओलसर जमिनीत वाढतात आणि त्यात बॅक्टेरियाची वाढ होऊ शकते ज्यामुळे एकदा खाल्ल्यानंतर संसर्गाचा धोका वाढतो, विशेषतः पावसाळ्यात. त्यामुळे पावसाळ्यात मशरूमला नाही म्हणलेलेच बरे.
पावसाळ्यात टोमॅटो खाताना काळजी घेणे गरजेचे आहे. कारण हवेतील जास्त आर्द्रतेमुळे टोमॅटोला लवकर बुरशी लागते.
पावसाळ्यात कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली, ब्रसेल्स स्प्राउट यांसारख्या भाज्या खाणंसुद्धा टाळायला हवं.
जास्त दमटपणामुळे विषाणू झपाट्यानं वाढतात. तसंच भाज्यांची स्वच्छता नीट केली जात नाही. त्यामुळे त्या दूषित होतात.