साक्षी राऊत
मान्सूनमध्ये फंगल इनफेक्शनपासून बचाव करणे तुमच्या त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी फार फायद्याचे आहे. पावसाळ्यात ही समस्या वाढते. तेव्हा यापासून बचाव करण्यासाठी हे उपाय करा.
हळदीचं दूध तुमचा फंगल इनफेक्शनपासून बचाव करेल. हळदीच्या दूधात अँटीइन्फ्लॅमेटरी आणि अँटीसेप्टिक गुणधर्म असतात. जे बॉडीचा इम्यून लेव्हल बूस्ट करण्यास मदत करतात. सीझनल आजारांपासून तुमचा बचाव करण्यातही हा उपाय प्रभावी आहे.
मान्सूनमध्ये फंगल इनफेक्शनपासून बचाव करण्यासाठी ताजी फळे आणि भाज्या खा. त्यामुळे तुमची इम्यून सिस्टिमही मजबूत होईल.
फंगल इनफेक्शनपासून बचाव करण्यासाठी हा आणखी एक प्रभावी उपाय आहे. हर्बल टी मध्ये असणारे अँटीबॅक्टेरियल गुण तुमचा इनफेक्शनपासून बचाव करतात.
प्रोबायोटिक्सयुक्त आहार जसे दही, संत्री आणि अननस यांसारख्या फळांचे सेवन करा. या उपायाने फंगल इनफेक्शनपासून तुमचा बचाव होईल.
सूपच्या सेवनाने बॉडी हायड्रेट राहते. सोबतच फंगल इनफेक्शनपासूनही तुमचा बचाव होतो. मान्सूनमध्ये सर्दी, खोकला इत्यादी समस्येपासून बचाव करण्यासाठी सूपचे सेवन फायदेशीर ठरते.
मान्सूनमध्ये अंजीरचे सेवन फंगल इनफेक्शनपासून बचाव करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यात असणारे अँटी- फंगल गुण रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यास मदत करते.
मान्सूनमध्ये खजूर खाणेही फायदेशीर आहे. खजूर खाल्ल्याने तुमची इम्यून सिस्टिम मजबूत राहते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.