पुजा बोनकिले
किडा किंवा कीटक चावल्यावर होणारा त्रास कमी करण्यासाठी बर्फाचा वापर करू शकता.
जर किडा किंवा कीटक चावलेल्या ठिकाणी खाज येत असेल, तर तुम्ही बेकिंग सोड्याचा वापर करू शकता.
तसेच तुम्ही किडा चावलेल्या भागावर कांद्याच्या स्लाइसने स्क्रब करू शकता.
किडा चावलेल्या ठिकाणी मध लावू शकता. मधामध्ये अँटिसेप्टिक गुणधर्म असल्याने आराम मिळतो.
किडा चावल्यास त्या भागावर लिंबाने स्क्रब करा.
तसंच मच्छर चावल्यामुळे तुम्हाला फोड येऊन खाज येत असेल, तर तुम्ही तुळशीचं पान हाताने चुरगळून ते प्रभावित भागावर लावू शकता.
अशा प्रकारे एखादा किडा किंवा कीटक चावल्यावर तुम्ही घरच्या घरी उपाय करू शकता.
जर तुम्हाला काही गंभीर परिणाम दिसून येत असतील, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.